शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या 'लोकसंवाद' या कार्यक्रमात हजेरी लावली आणि वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन दिलखुलास संवाद साधला. यावेळी 'शिवसेना प्रत्येक प्रकल्पाला विरोधच करते का?' या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी, 'नाणार प्रकल्पाच्या बाबतीत जे झालं तेच बारसूच्या बाबतीत झालंय. तिथल्या जमिनी मूळ मालकाकडून स्वस्तात घेण्यात येऊन आता प्रकल्पातून मिळणारा मोबदला भलत्यांनाच मिळणार आहे' असा थेट आरोप केला. त्याचबरोबर 'मेट्रो कारशेडच्या जागेला विरोध होता, मुंबई मेट्रोला नाही' असे विधानही त्यांनी यावेळी केले