आजही मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे (Shivsena) किमान १०० आमदार निवडून येतील. उदय सामंत (Uday Samant) किंवा दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं आहे, अशा शब्दांत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.