Uddhav Thackeray on Border Dispute: सीमावादाच्या ठरावावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक वादासंदर्भातील ठराव आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. यामध्ये कर्नाटक सीमा भागातील बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्या संदर्भातील ठराव सादर करण्यात आला. हा ठराव एक मताने विधानसभेत मंजूर झाला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी राज्य सरकारचे अभिनंदन करतो. हा ठराव गरजेचा होता. सीमाभागतील माता,भगिनी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत यासाठीही सरकारचे अभिनंदन. सुविधा ज्या देण्यात येणार आहे त्याबद्दल स्पष्टता हवी आणि भाषिक अत्याचाराचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे'
#uddhavthackeray #adityathackeray #balasahebanchishivsena #balasahebthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathi