जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. काल पहिल्या दिवशी या संपामुळे स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालये ओस पडली होती. त्यामुळे सामान्य माणसांचे हाल झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या संपावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. तसेच शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं. ते विधिमंडळात माध्यमांशी बोलत होते.