Uddhav Thackeray on Shinde-BJP:'माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला...'; ठाकरेंचे थेट आव्हान
“काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला, आता स्वत: प्रभूरामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. हा योगायोग म्हणावा की आणखी काय माहीत नाही. परंतु असं कधीकधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला आहे, तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या, मी माझी मशाल घेऊन समोर येतो पाहूयात काय होतं?” असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते