मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता माझ्या हातात द्या असे जनतेला आवाहनही केले. 'एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळा महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं हे चालणार नाही' असे विधान त्यांनी केले