"पेपर उघडल्यावर आहेच यांचे फोटो"; जाहिरातीवरून अजित पवारांचा जोरदार टोला | Ajit Pawar
जालन्यात राजेश टोपे यांच्या नवीन साखर गाळप युनिटचं विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातीबाजीवर जोरदार टीका केली. राज्य सरकार हजारो कोटी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च करत आहेत. शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा तेव्हा तुमची दातखिळी बसते का?, असा प्रश्नही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला