विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनावेळी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर सरकाला प्रश्न विचारले. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर सवाल केले. पवार म्हणाले की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं प्रत्येक सरकारसमोरचं मोठं आव्हान असतं. हे सरकार त्यात अपयशी ठरल्याचं चित्र राज्यात दिसत आहे.