राहुल नार्वेकर हे विधानसभेचे नवे अध्यक्ष झाल्याबद्दल अजित पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. "राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.