मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डीला गेले असताना अचानक त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत.