चिंचवड पोटणीवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आले असता त्यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका केली. 'राहुल कलाटे नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते आता कुठल्याच पक्षाचे राहिलेले नाहीत. ज्या पक्षाने सहकार्य केलं त्यांच्यासोबत राहुल कलाटेंनी गद्दारीच केली. आजवर त्यांनी बऱ्याच लोकांना मारहाण केली आहे. शब्दांचे खेळ करून राजकारण करणारे ते राजकारणी आहेत' अशी टीका रोहित पवार यांनी राहुल कलाटे यांच्यावर केली.