गेले काही दिवस लसीकरणासाठी कमी झालेले गर्दी आत्ता पुन्हा होऊ लागली आहे. करोना रुग्णवाढ व ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे सुरक्षा म्हणून लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यात किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाल्याने मंगळवारी टिटवाळा रेल्वे स्थानकातील लसीकरण केंद्रावर गर्दी झाली. त्यात फलाटावरील प्रवासी घाई करुन रांगेत घुसत असल्याने, रहिवासी व प्रवाशी यांच्यात वाद झाले. लसीकरणासाठी असलेले अनेक कर्मचारी शाळांमध्ये मुलांच्या लसीकरणासाठी गेल्याने या केंद्रावर फक्त दोनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे लाभार्थींची गैरसोय झाली. लाभार्थीनी नाराजी व्यक्त केली असून योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे