महाराष्ट्रातील नागरिकांनी करोनाला घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. इतर देश आणि राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची हर्ड इम्युनिटी जास्त आहे. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियम पळून साजरा करावा, असे आवाहनही सावंत त्यांनी केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील सांगवीतील आरोग्य शिबिरात बोलत होते.