राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आठवी ते बारावीचे वर्ग देखील सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याबाबत विचारणा केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुलांची शाळा लवकरच सुरु होणार असून याला राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची मान्यता असल्याचं देखील टोपे म्हणाले आहेत.