देशात आणि राज्यात मॉलसह अनेक ठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेले असणं अनिवार्य करण्यात आलंय. परंतु अजूनही अनेक जण लस घेण्यास तयार नाही आहेत. लस न घेताच प्रमाणपत्र घेण्यासाठी ते पैसे मोजायला तयार आहेत. असाच काहीसा प्रकार औरंगाबादमधून समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस स्टेशन पोलिसांनी लस न घेता प्रमाणपत्र देणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं आहे.