अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने तर मर्यादित प्रवेश दिला जाणार असल्याचं मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आल्याने तसेच निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केल्याचे दिसून आलं. त्यामुळे ट्र्स्टच्या या निर्णयाचा मूळ हेतूच साध्य झाला नाही.
#India #Mumbai #pune #dagdushethganpati #SiddhivinayakGanapatiTemple #GaneshAngarkiChaturthi #Covid19