नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्टयांमध्ये कोरोना शिरत असून, मंगळवारी आणखी 11 रुग्णांची भर पडली. यामुळे रुग्णसंख्या 1076 वर गेली असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे.
नागपूर : "चाची 420' आणि "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे, पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि भंडारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.
नागपूर : युवकाने आनंदाच्या भरात बर्थ डेच्या दिवशी तलवारीने केक कापला. केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती क्राईम ब्रॅंचला मिळाली.
वर्धा : येथील इतवारा बाजार परिसरात पोलिसांनी जप्त केलेल्या चामड्यांमुळे वर्धेत अनधिकृत जनावरांच्या कत्तली तर होत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या चामड्यांची तपासणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली.
अमरावती : आईच्या नावावर असलेली तीन एक शेती आपल्या नावावर करण्यासाठी मागणी दोन वर्षांपासून तीन भावांमध्ये संघर्ष सुरू होता. यासाठी तिन्ही भावांमध्ये नेहमीच भांडण होत होते. तसेच आईसोबतही त्यांनी अनेकदा वाद घातला होता.
गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण करता यावी, यासाठी किराणा दुकाने व अन्य दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठरवून दिली आहे. परंतु, ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी न करता रात्री उशिरापर्यंत किराणा दुकाने सुरू असतात.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha