नागपूर ः नागपुरात रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. ही आकडेवारी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. तसेच मृतांचा आकडाची सतरावर पोहचला आहे.
नागपूर : शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची पालकांना सक्ती करू नये, असा शिक्षण विभागाचा स्पष्ट आदेश आहे. तो झुगारून मनमानी शुल्कवसुली आणि शालेय साहित्याची विक्री करणाऱ्या काही शाळांना उपसंचालकांनी पत्र पाठवून विचारणा केली.
अमरावती : गेल्या 24 तासांत अमरावतीत तीन जणांनी आत्महत्या केली. शहरातील प्रशांतनगर येथील कंत्राटदार विवेक गंगाधर डांगे (वय 33) यांनी स्वत:च्या घरातील विहिरीत उडी घेऊन मंगळवारी (ता. 16) आत्महत्या केली. तर, बडनेरा आणि परदेशीपुरा, रहाटगाव परिसरात दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
वरोरा (जि. चंद्रपूर) : अपघाताच्या एका प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी दहा हजारांची मागणी करणाऱ्या येथील सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 16) अटक केली. रमेश खाडे, असे लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha