नागपूर ः कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना शिरला आहे. त्यातच होणारे मृत्यू हळूहळू वाढत आहेत. रविवारी कोरोनाबाधिताचा मृत्यूनंतर लगेच सोमवारी 36 वर्षीय पुरुषाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या वीसवर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा 1306 झाला आहे. मे व जून महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेक मोठ्या सभा, जाहीर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेत. ते भविष्यात कधी होतील याचा अंदाजही बांधता येत नाही. याच संकटात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मुहुर्त देखील हरवला. अख्खे आयोजनच रद्द करण्याची वेळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांवर आली आहे
नागपूर : महापालिकेत आयुक्तांसोबत वाक्युद्ध करणारे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभेनंतर काही तासांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आयुक्तांची कथित नियमबाह्य कामे असून सोमवारपासून नागरिकांपुढे मांडणार असल्याचा इशारा दिला. त्याच वेळी आयुक्तांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर तरुणाईच नव्हे, तर काही ज्येष्ठ नागरिकही पुढे आले आहेत.
चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीत उद्योग बंद पडलेत. व्यवसायांना फटका बसला. रोजगाराचा प्रश्न बिकट झाला होता. अशात मास्कनिर्मितीतून महिला बचतगटाने मोठी भरारी घेतली. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा येथील बचतगटातील महिलांनी बारा ते पंधरा हजार मास्कची निर्मिती केली. धारिवाल कंपनीच्या पुढाकारातून पांढरकवढासह आठ गावांत महिला समीक्षकरणाचा कामांना वेग आला आहे.
गडचिरोली : नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्याकरिता शासनातर्फे पोलिस ठाणे आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ड्रोनद्वारे तीन किलोमीटर परिसरामध्ये लक्ष ठेवण्यात येणार आहे. नक्षल कारवाया रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
वर्धा ः गिरड तालुक्यातील विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनीने सभासदांना हळदीचे बियाणे विनामूल्य न्या, हमखास उत्पादन घ्या व पुढच्या वर्षी बियाणे परत करा, असा उपक्रम हाती घेतला आहे. 12 गावांत हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वदूर प्रसिद