नागपूर ः उपराजधानीत दर दिवसाला कोरोनाबाधिताचे होणारे मृत्यू प्रशासनासाठी चिंताजनक बनले आहेत. सोमवारी दोन मृत्यू झाल्यानंतर लगेच मंगळवारी (ता. 14) एका 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला.
नागपूर : नोकरीवरून बडतर्फ तसेच विविध कारणासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेलाच कोर्टात खेचल्याचे पुढे आले आहे. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले.
अमरावती ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सम विषम पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता व्यापाऱ्यांनी ही पद्धती बंद करून आठवड्यातील पाच दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नागपूर ः जिल्ह्यातील भिवापूर येथे प्राकलन किंमतीच्या25 ते30 टक्के कमी दराने कंत्राट मिळवून केले जात असलेल्या रस्ते व नाल्या बांधकामात प्रचंड घोळ दिसून येत आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पावसापासून बचावासाठी नवोदय विद्यालय फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली अनेकजण उभे होते. तेथेच वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, चौघे गंभीर जखमी, तर 15 ते 17 जण किरकोळ जखमी झाले.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha