विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या (ता. 20) महत्त्वाच्या घडामोडी

Sakal 2021-04-28

Views 556

नागपूर : सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेले प्रश्‍न व त्यावर दयाशंकर तिवारी यांच्यासोबत झालेली खडाजंगीनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संतप्त होऊन सभागृहच सोडले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर कारवाईबाबत प्रक्रिया काय? यावर चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर : मदतीला धावून जाताना भारतीय नागरिक कुठलाही कसूर करीत नाहीत. याचाच प्रत्यक अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आला. हा भारतीय नागरिक आपल्याच संत्रा नगरीतील आहे, हेही विशेषच... मिहीर पेंढारकर असे या तरुणाचे नाव आहे.

नागपूर : शहरात मोठ्या संख्येने नाट्यकलावंत राहतात. अनेक कलावंतांच्या रोजीरोटीचे साधनच नाटक असल्याने, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यगृहे खुले कधी होतील आणि नाटकांचे खेळ कधी रंगतील असा प्रश्न असताना तुर्तास या कलावंतांना व रंगमंच कामगारांना जगविणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच हेतूतून स्थापन झालेल्या "मनाकसं'ने शुक्रवारी महापौर संदीप जोशी यांची भेट घेतली.
धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : हम भी किसीसे कम नही, असे सांगत शेंदूरजनाखुर्द येथील जिल्हा परिषद व एकता विद्यालयात शिक्षण घेतलेल्या रूपाली देविदास मोगरकर या विद्यार्थिनीने चक्क तीन स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास रचला होता. आणि तोही महिला दिनी.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : वनवैभवाने संपन्न असलेल्या धाबा वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांत वन्यजीवांच्या शिकारीच्या घटनांत वाढ झाली आहे. येथील उच्च दर्जाच्या सागवानाची तस्करी जोरात सुरू आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS