विदर्भ व नागपुरातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी
महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या वाढदिवशी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली. यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह सर्व चाहत्यांना धक्का बसला. चार निवडणुकांपासून आपण सतत लढत आहोत. आता कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याच त्यांनी सांगितल आहे. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजू लागली आहे.यासाठी नागपुरातील एम. टेक. झालेला समीर श्रीकांत देवळे या युवकाने पुढाकार घेतला आहे.इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारणे आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन करत आहे.लॉकडाऊनमध्ये बराच वेळ घरी रिकामा मिळाल्याने समीरने इतरांनीही इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ‘निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे समीरच्या कार्यशाळेचा उद्देश आहे.
पाहूणी म्हणून घरी आलेल्या १४ वर्षीय नातीला नराधम आजोबाने आपल्या वासनेचा बळी बनवले. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्याने नात नंदनवनमध्ये राहणाऱ्या आजीकडे राहायला आली होती. आईची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे तिला आजीकडे आणून सोडले होते. याच वेळी आजोबाने तिच्यावर सलग सहा महिने बलात्कार केला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली आहे.
केलेल्या सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी लाच मागणाऱ्या सिंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास श्रीनारायण झंवर (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. वर्ग दोनचा दर्जा असलेल्या या अधिकाऱ्याने देयक काढण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली होती.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतलेल्या लोकांचा अनुभव अतिशय वाईट आहे.येथे रुग्णांना एका खोलीत डांबून ठेवले जाते. त्या खोलीच्या बाहेरील दाराला कुलूप लावले जात असल्याची माहिती डिस्चार्ज झालेल्या रुग्णाने दिली. डॉक्टर तपासणीसाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठी देखील येत नाहित, कोरोना व?