विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 1.3K

महापालिकेची तिजोरी सांभाळल्यानंतर शहर विकासासाठी कोट्यवधीची तरतूद करणारे हात आज सुरक्षा रक्षकाची नोकरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहे. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवराव तिजारे यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या जबाबदारीमुळे नोकरी करावी लागत आहे.

नागपूर शहरातील 173 इमारती जीर्ण व धोकादायक असून यातील किमान हजार नागरिकांचा जीव धोक्‍यात आहे. शहरात विविध प्रवर्गाच्या इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण 173 इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले. राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करावयाच्या 97 इमारती आढळल्या आहेत.

जीएसटीची चोरी करणाऱ्या व प्रक्रिया न केलेल्या तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या जळगाव येथील कारखान्यावर नागपूर विभागाच्या वस्तू व सेवाकर महासंचालनालयाने (दक्षता) छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई नागपूर विभागाने नाशिक विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने केली.

अमरावती : आदिवासीबहुल भाग असलेल्या धारणी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या तब्बल पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या सोबतच एकूण 16 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 1163 झाली आहे.

चंद्रपूर : येथील लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात मयूरी बारावीचे शिक्षण घेत होती. मयूरी शेताच्या बांध्यावर रोवायला गेले अचानकपणे घरचा भ्रमणध्वनी वाजला. तो मयुरीच्या महाविद्यालयातून आलेला होता. भ्रमणध्वनीवरून प्राचार्य प्रदीप ब्राह्मणकर यांनी मयूरी बारावीच्या परीक्षेत कुंदोजवार महाविद्यालयातून प्रथम आल्याची माहिती दिली. कला शाखेतून तिने 78 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

अमरावती : राजस्थाननंतर महाराष्ट्र असा भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी सुरू केलेला कथित प्रचारावरून राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ऍड. यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपला त्यांनी सत्तेसाठी वळवळणारा शेणातला कीडा असे संबोधले आहे. त्यावर पलटवार करीत भाजपनेही कॉंग्रेसमधील असंतुष्टच बाहेर पडत असल्याने यशोमती ठाकूर यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्ला दिला आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS