नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे आज मंगळवारी (ता. २२) निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. ते सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते.
नागपूर : कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकीटांचे पैसे परताव्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोरोनामुळे रद्द झालेल्या तिकिटांचे पैसे विमान कंपन्यांनी परत करण्याऐवजी 'क्रेडीट शेल'मधे ठेवून घेतलेले आहेत. असंख्य ग्राहकांचे कोट्यावधी रूपये त्यात अडकून आहेत. अशा अनेक प्रकरणांची दखल घेत प्रवासी लिगल सेल'ने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
नागपूर : एक आठवड्यापूर्वी रामचंद्रन अय्यर यांनी विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांचा मुलगा आर. सिवा सुब्रमनियननेही नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित चौथ्या प्रभाकर कारकर स्मृती ऑनलाइन जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.
नागपूर : मराठा आरक्षणावरून राज्यभर पुन्हा रान पेटले आहे. आंदोलने सुरू झाली आहेत. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर अध्यादेशाचा पर्याय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुचविला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्ग निवडायचा? याबाबत बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे समजते.
नागपूर : कोणत्याही व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. सुदृढ प्रकृतीमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, या भ्रमात राहू नका. कोरोनापासून बचावासाठी नियमांचे पालन करा, असा सल्ला डॉ. अश्विनी तायडे आणि आयएमए महाराष?