काँग्रेस नेते नसिम खान यांनी दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी काँग्रेस नेत्यांसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. संजय राऊत भाषणासाठी उभे राहिले असता महाविकास आघाडीच्या नावे जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. आपण शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहोत. देशाची ही लढाई आपल्या एकत्र लढायची आहे, असं ते म्हणाले.