औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट व ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते एकाच सोफ्यावर बसले होते. पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिरसाट आणि खैरेंनी आपापल्या अंदाजात उत्तरं दिली. तसंच प्रत्येक ज्येष्ठांचा आपण आदर करतो असंही शिरसाट म्हणाले.