Sanjay Shirsat on Sanjay Raut: 'सायको माणसाच्या प्रश्नाला...'; संजय शिरसाटांची राऊतांवर टीका
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं आहे. त्यानंतर शिंदे यांचा गट आक्रमक झाला आहे. आज ( २० फेब्रुवारी ) प्रतोद भरत गोगावले यांनी काही आमदारांसह जात शिवसेना विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. चोरांच्या टोळीने आज कार्यालयावर दावा ठोकला आहे. पण, हे फार काळ चालणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.