Sanjay Raut on Shinde: 'मी धमकी दिली म्हणून सोडून गेले की...'; राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र
'मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे' अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे.#sanjayraut #eknathshinde #cmeknathshinde #shivsnna