माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाणे दौऱ्यावेळी शिदें गटावर जोरदार टीका केली होती. ठाण्यातले निष्ठावान आणि अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर आपण कामाने उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं. ठाण्यातील एका कार्यक्रमात शिंदे बोलत होते.