महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी (२२ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कवर मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जंगी सभा झाली. या सभेत राज यांनी शिवसेना (ठाकरे गट), उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर सडकून टीका केली. दरम्यान, राज यांची सभा स्क्रिप्टेड होती असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे