मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घातल्या गेल्या. हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या आता. जसे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून देता तसे. महाराष्ट्र प्रेम यांचं खोक्याखाली दबलं गेलं आहे'