पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीदरम्यान जिकडे जाईल तिकडे रवींद्र धंगेकर दिसत होते. त्यामुळे जनतेने त्यांना रवींद्र धंगेकर दाखवून दिले, असा टोला धंगेकरांनी लगावला आहे. तसंच लवकरच सर्व नेत्यांची भेट घेणार असून मातोश्रीवर जाण्याबाबतचेही त्यांनी संकेत दिले आहेत. यासह खासदार भाजपा गिरीश बापट यांच्या भेटीविषयी देखील त्यांनी माहिती दिली.