कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर यांनी आपल्या निवासस्थानी गुढीपाडवा हा सण साजरा केला. यावेळी रविंद्र धंगेकर म्हणाले की, 'मी राजकीय जीवनात ३० वर्षापासुन असून हा सण समाजातील प्रत्येक वर्गासोबत साजरा करीत आलो आहे. त्यामुळे आमदार झालो असलो तरी मी एका कार्यकर्त्याप्रमाणे सण साजरा करत आहे. आज आपण कोणताही सण साजरा करताना. धर्मामध्ये कोणीही राजकारण आणू नये तसेच इतर धर्माचा कोणीही द्वेष करू नये' अशी भूमिका त्यांनी मांडली.
रिपोर्टर: सागर कासार