कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महा संघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मविआच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी 'मला विश्वास आहे की कसब्यातून रवींद्र धंगेकर निवडून येतील' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.