कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी रासने यांनी दिले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला विजयाचा आत्मविश्वास असल्याचे सांगितले. मी ३० ते ५० हजारच्या आघाडीच्या मतांनी जिंकणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर यावेळची संख्या ही विक्रमी असेल असा आत्मविश्वास त्यांनी दर्शवला.