कसबा पेठ मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप रगंल्याचं पाहायला मिळत आहे. धंगेकरांनी यावर प्रतिक्रिया देत आपण या प्रकरणी संबधित अधिकार्यांसमोर बाजू मांडणार असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीचा प्रचार झाला तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत होते, असा आरोप धंगेकरांनी केला आहे. तसंच याविरोधात आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.#kasbapeth #ravindradhangekar #eknathshinde #congress #rashtravadicongress
रिपोर्टर - सागर कासार