Kasba Byelection: Girish Bapat यांची मतदानाला हजेरी; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
कसबा विधानसभेच्या जागेसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपा खासदार गिरीश बापट हे देखील यावेळी व्हिलचेअरवरून मतदान केंद्रावर आले होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून पुढे जात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गिरीश बापट मतदान करून आल्यानंतर त्यांनी उभं राहत हेमंत रासने प्रचंड बहुमताने निवडून येणार, असं म्हणत गणपती बाप्पा मोरयाची घोषणा दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट यांची तब्येत काहीशी खालावली आहे. असं असूनही ते हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी उपस्थित राहिले होते. यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका देखील केली होती.#kasbapeth #girishbapat #bjpparty