गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. आपल्या पतीच्या विजयावर प्रतिक्रिया देताना प्रतिभा धंगेकर म्हणाल्या की, 'खूप आनंद झाला असून, एकदा मी मुक्ता टिळक यांना भेटले होते त्यावेळी त्या मला बोलल्या होत्या तुमचे पती खूप काम करतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे'
रिपोर्टर: सागर कासार