“आतातरी राजभवनाचे भाजपा कार्यालय बनवू नका”; Sanjay Raut यांचा नव्या राज्यपाल आणि भाजपाला इशारा
“महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या विरोधात राज्यातील जनतेने, छत्रपती शिवाजी महाराज यांना माननाऱ्या संघटनांनी भूमिका घेतली. राज्यपालांच्या विरोधात राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता रस्त्यावर उतरली. भाजपाचे एजंट म्हणून राजभवनातून राज्यपालांनी काम केले. राज्यपालांचा राजीनामा मंजूर करुन महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत. राज्यपालांची हकालपट्टी यापूर्वीच करायला हवी होती. जर केंद्राने राज्यातील सामान्य जनतेचा आवाज ऐकला असता तर फार पूर्वीच राज्यपालांना घरचा रस्ता दाखविला गेला असता.”, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.