शिवसेना हा मूळ पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला व्हीप बेकायदेशीर आहे. जर पीठासीन अधिकारी कायद्याची मोडतोड करून आमच्या लोकांवर कारवाई करण्याचं कारण शोधलं तर त्यांनी आपली वकिलीची सनद परत करावी आणि कायदा पहावा, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंवरही बाळासाहेबांच्या वक्तव्यावरून टीका केली.