कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकरांचे कार्यकर्ते याचा जल्लोष साजरा करत आहेत. असं असतानाच धंगेकर यांनी घोले रोडवरील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांचा आशीर्वाद घेतला. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. अशा परिस्थितीतही त्यांनी रासनेंच्या प्रचाराला हजेरी लावली होती.