खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक राजकीय नेते मंडळी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे अंत्यदर्शन घेताना काहीशा भावुक झाल्या. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं. सायंकाळी गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.