'पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तेव्हा कोरोनाचा काळ होता. त्यावेळी केंद्र सरकारने दिलासा दिला होता इतर राज्यांनी दर कमी केले, पण तुम्ही जनतेला दिलासा दिला नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही तत्काळ दिलासा दिला. केवळ राजकीय विधाने करून आणि माध्यमांत येण्यासाठी बेताल आरोप करून तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकत नाही' असे स्पष्टीकरण देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना उत्तर दिले.