Devendra Fadnavis: '...तेच लोक मोदींवर टीका करू शकतात'; फडणवीसांचा विरोधकांना टोला
'नरेंद्र मोदी यांचे मिशन इंडिया सुरू आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबईत आले, याचा आनंद आहे. जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाही, ते लोक यावर टीका करू शकतात' असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला त्याचसोबत पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर बोलताना 'त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि हे प्रकरण फास्टट्रॅक वर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करू' असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले.