Devendra Fadnavis: 'कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून...'; विरोधकांना फडणवीसांचे स्पष्टीकरण
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच पत्र नऊ राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच लिहिलेले आहे, यावर अमरावतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 'कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे, न्याय मिळत नसेल तर न्यायालय आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी यंत्रणांचा असा गैरवापर झाला असल्यास ते उदाहरण दाखवावे'. 'विरोधी पक्षातून भाजपामध्ये आला, म्हणून कुणाचीही चौकशी बंद झाली नाही' असा दावाही फडणवीस यांनी केला.