देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अत्यंत मोलाचा वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या कामगिरीचे मोजमाप करणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ सिद्ध झाला. यानिमित्त मुंबईतल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक काल (४ मार्च) प्रसिद्ध झाला . यावेळी फडणवीसांनी 'लोकसत्ता जिल्हा निर्देशांक' याचा आम्हालाही अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. यामध्ये एखादा जिल्हा तळाला आहे त्याला वरती आणण्यासाठी आम्हाला विचार करता येईल. 'लोकसत्ता'च्या या उपक्रमाचे मी आभार मानतो. या डेटाच्या आधारे अनेक मुलभूत बदल आपण घडवू शकतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.