महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मी जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून निवडून देईल. अजित पवार हे मला आमदार करणार नाहीत जनता करणार आहे. त्यामुळे मी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं आहे. राहुल कलाटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे.