ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं ते म्हणाले. मात्र कलाटे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांच्याशी संपर्क साधला असून त्यांची भेट देखील घेणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी चिंचवड मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे.