चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अधिकच रंगदार स्थितीत पोहचणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणला आहे. असं असतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राहुल कलाटे यांचं आव्हान असण्याची शक्यता आहे. स्वतः राहुल कलाटे महाविकास आघाडी कडून लढण्यास इच्छुक आहेत. अशी प्रतिक्रिया कलाटे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.