चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी मध्यरात्री जगताप कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच प्रचाराचा आढावा घेऊन अश्विनी लक्ष्मण जगताप या बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.